Ankita Walwalkar : बिग बॉस मराठी’ फेम आणि सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालवलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या “गुड न्यूज”मुळे चर्चेत होती. चाहत्यांना ती आई होणार असल्याचा अंदाज होता; अखेर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अंकिता आणि तिचा पती कुणाल यांनी पनवेलमध्ये नवीन घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. “ऑफिशिअली पनवेलकर” झाल्याचे सांगत तिने नव्या घराची झलक दाखवत काही खास फोटोही पोस्ट केले आहेत. हेही वाचा : Raj Thackeray : ‘महाराष्ट्र-पुढचा’ राज ठाकरेंचे व्हिजन; व्हिडिओद्वारे मांडला संकल्प अंकिताने आपल्या पोस्टमध्ये तिच्या प्रवासाबद्दल भावनिक शब्दांत लिहिले, “घर घेणं… हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते… पण मनात एकच विचार ‘माझं घर कधी?’,” असं तिने म्हटले आहे. View this post on Instagram A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl) ती पुढे म्हणते, “स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची… कारण लायकी आपण वाढवू शकतो.” तिच्या या पोस्टमधून तिचा संघर्ष आणि मेहनतीचा प्रवास स्पष्टपणे दिसून येतो. अंकिताने चाहत्यांनाही प्रेरणा देत लिहिलं, “अभिमान पैशांचा नाही, अभिमान आहे त्या प्रवासाचा. जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा. उशीर झाला तरी चालेल… पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीने बांधलं जातं.” ती पोस्टमध्ये पुढे असेही म्हणते, रिस्क घ्यायची हिंमत असेल,तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं. आज या चाव्या हातात आहेत आणि मनात एकच भावना या पृथ्वीवर आमची स्वतःची एक जागा आहे. छोटी असेल… पण आमची आहे. आणि ती आम्ही दोघांनी उभी केली आहे, असेही अंकिताने लिहिले आहे. दरम्यान, अंकिता आणि कुणाल यांच्या या नव्या घरासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या “गुड न्यूज”ने चाहत्यांनाही आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. हेही वाचा : Realme P4 Lite 5G: ७०००mAh बॅटरीसह 5GRealme P4 Lite 5G लॉन्च; बजेटमध्ये दमदार फीचर्स