“आजूबाजूची हजारो घरे बेकायदेशीर पण मशीदच का पाडली?” ; असदुद्दीन ओवेसींनी मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

Mosque Demolition। एआयएमएएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज राज्यातील मशीद पाडल्याच्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. असदुद्दीन ओवेसी यांनी, “पुण्यातमशिदी भोवती असणारी हजारो घरं बेकायदेशीर आहेत पण फक्त मशीद पाडली जाते, असे का ? म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत हा सवाल केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ओवेसी यांनी,”पिंपरी-चिंचवड, पुण्यातील थेरगाव काळीवाडी येथे एक मशीद आहे, जी गेल्या 25 वर्षांपासून अस्तित्वात आहे, मशिदीच्या आजूबाजूला सुमारे एक हजार घरे आहेत, ज्यांना कोणतीही परवानगी नाही, परंतु केवळ मशीद दारूलुलम जामिया इनामिया पाडली जात आहे.” असे का करण्यात येत आहे? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला प्रश्न Mosque Demolition।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल करत ते म्हणाले की, “केवळ एका मशिदीसाठी हा भेदभाव का, ज्या घरांनाही परवानगी नाही, त्यांचे काय? ते म्हणाले की, उजव्या हिंदुत्ववादी संघटनांनी केवळ मशीद पाडल्याबद्दल तक्रार केली आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
सोमनाथ मंदिरामागील अतिक्रमणावरही निषेध व्यक्त Mosque Demolition।
असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरातमधील सोमनाथ विकास प्रकल्पांतर्गत मंदिरामागील बेकायदा अतिक्रमणाविरोधातील कारवाईला विरोधही केला होता. त्याने अल जझीराचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये बेकायदेशीर आणि अतिक्रमण म्हणून मशिदी आणि इतर बांधकामे पाडण्याची कारवाई दाखवण्यात येत आहे.
हेही वाचा
जागावाटपाबाबत रामदास आठवलेंचे भाजपला पत्र ; पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी





