Monalisa: महाकुंभातील ‘मोनालिसा’ची पहिली फिल्म, ‘द डायरी ऑफ मणिपूर’च पोस्टर प्रदर्शित

Monalisa : प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात माळा विकताना व्हायरल झालेली मोनालिसा भोसले सध्या पुन्हा चर्चेत आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचा ‘द डायरी ऑफ मणिपूर’ हा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून, चाहत्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मोनालिसा आधी म्युझिक व्हिडिओत झळकली आणि आता ती थेट चित्रपटात पदार्पण करत आहे. पोस्टरमध्ये ती साध्या गावकुसाबाहेरील मुलीच्या भूमिकेत दिसत असून, चित्रपटाच्या नायकासोबत तिची झलक पाहायला मिळते. या नव्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक अनुभव मोनालिसाने शेअर केला आहे. पहिल्याच दिवशी शूट करताना बंदुकीचा सीन असल्याने ती खूप घाबरली होती. गोळी लागण्याचा सीन तिला खरा वाटला होता. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी आधी थोडी गंमत केली आणि नंतर तिला समजावले, असे तिने सांगितले.
View this post on Instagram
मोनालिसाचा प्रवास खूप साधा आहे. ती एका लहानशा घरात वाढली. धार्मिक मेळ्यांमध्ये माळा विकून कुटुंबाला हातभार लावत होती. एक दिवस तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. तिचं हसणं, डोळे आणि साधेपणा लोकांना भावला.
आतापर्यंत माळा विकून काहीशे रुपये कमावणारी मोनालिसा आता इव्हेंट्स, ब्रँड प्रमोशन आणि चित्रपटांमधून पुढे जात आहे. सोशल मीडियावर ती महागड्या कारमध्ये फिरताना दिसत असून, तिचं स्वप्न मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं आहे.
महाकुंभातून सुरू झालेला मोनालिसाचा हा प्रवास आता रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचला असून, तिची पहिली फिल्म प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे.





