Kantara Chapter1 : शांत नजर, स्मित हास्य अन्…; कांतारातील अभिनेत्रीचा लक्षवेधक फर्स्ट लूक समोर

Kantara Chapter 1 : अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर १ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ऋषभने एक व्हिडीओ शेअर करत सिनेमाचं रॅप अप झाल्याचं जाहीर केलं होतं. आता रिलीजचे दिवस जवळ आल्याने सिनेमातील पात्रांची ओळख करणारे पोस्टर समोर येत आहेत. आता या सिनेमातील एका अभिनेत्रीचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये अभिनेत्री रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा फर्स्ट लूक शेअर केला होता. ज्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
आता वरमहलक्ष्मी महोत्सवानिमित्त, होंबाले फिल्म्सने त्यांच्या आगामी ‘कांतारा चॅप्टर १’ सिनेमातील कनकवतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये रुक्मिणी वसंतचे पात्र पारंपारिक वेशभूषा आणि दागिन्यांमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
View this post on Instagram
हा सिनेमा २०२२ मध्ये आलेल्या कांतारा या सिनेमाचा प्रिक्वल असणार आहे. कांताराच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी सर्वात्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे २०२३ मध्ये या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याने या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा केली होती. त्यामुळे आता ‘कांतारा चॅप्टर १’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार असल्याने चाहते यासाठी उत्सुक आहेत. हा सिनेमा कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Radhika Apte: “प्रेग्नेंसीत डॉक्टरकडेही जाऊ दिलं नाही; राधिका आपटेचा भारतीय निर्मात्यावर धक्कादायक आरोप”





