Mohammed Shami Fitness Update | मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCIने फिटनेसबाबत दिली मोठी अपडेट…

Medical & Fitness Update on Mohammed Shami | टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत क्रिकेट चाहते सतत चिंतेत असतात आणि प्रश्न उपस्थित करत असतात. कर्णधार रोहित शर्माकडूनही प्रत्येक वेळी त्याच्या फिटनेसबाबत अपडेट्स घेतले जात आहेत. आता अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रथमच शमीच्या सद्यस्थितीचे अपडेट जारी केले आहे आणि बीसीसीआयने दिलेली माहिती टीम इंडिया आणि शमीच्या चाहत्यांच्या चिंतेत वाढ करणारी आहे. शमीचे टीम इंडियात पुनरागमन करणे सध्या कठीण दिसत असून विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याची खेळण्याची शक्यताही कमी आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने सोमवार 23 डिसेंबर रोजी शमीच्या फिटनेसबद्दल तपशीलवार अपडेट दिले आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी शमीची निवड झाली नसल्याची माहिती दिली. बीसीसीआयने सांगितले की, “टाच दुखापतीने त्रस्त असलेला शमी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय संघासोबत त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे आणि या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत क्रिकेटमधील सततच्या गोलंदाजीमुळे त्याच्या गुडघ्याला सूज आलेली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी वैद्यकीय पथकाने त्याला तंदुरुस्त मानले नाही.”
🚨 News 🚨
Medical & Fitness Update on Mohammed Shami #TeamIndia
Read 🔽
— BCCI (@BCCI) December 23, 2024
बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “टाचेच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर शमीने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आणि 43 षटके टाकली. यानंतर शमीने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये बंगालकडून सर्व 9 सामने खेळले. बोर्डाने असेही म्हटले आहे की, या सामन्यांव्यतिरिक्त शमीने सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही भरपूर गोलंदाजी केली, जेणेकरून त्याला कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजीसाठी तयार करता येईल. मात्र, यादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला सूज येऊ लागली, जे जास्त गोलंदाजीमुळे होते. कामाचा ताण वाढल्याने असे होणे स्वाभाविक असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात शमीने बंगालसाठी 43 षटके टाकली होती. यानंतर तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नऊ सामने खेळला. त्याने अनेक अतिरिक्त गोलंदाजी सत्रांमध्येही भाग घेतला. त्यामुळे त्याच्या जॉइंटवर (गुडघ्याच्या सांध्यावर) दबाव होता. त्यामुळे त्यांच्या डाव्या गुडघ्याला सूज आली आहे. बऱ्याच काळापासून गोलंदाजी केल्यामुळे असे घडते.”
बीसीसीआयने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “सध्याच्या वैद्यकीय मूल्यांकनानुसार शमीचा गुडघा बरा होण्यास आणि गोलंदाजीचा भार उचलण्यास वेळ लागेल. याच कारणामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी तंदुरुस्त मानला गेला नाही.”
Vinod Kambli | पुन्हा एकदा विनोद कांबळीची खालावली प्रकृती, रुग्णालयात केलं दाखल…
एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर…
मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात 7 सामने खेळले, ज्यात त्याने 24 विकेट घेतल्या होत्या. तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, परंतु विश्वचषक स्पर्धेतच त्याला घोट्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.





