पुन्हा एकदा झळकणार मोदींचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर अधारित ‘इंडिया इन माय वेन्स’ नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक (बॉबी) असणार आहेत. सुभाष मलिक यांनी यापूर्वी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. विशेष म्हणजे ते अयोध्येच्या रामलीलाचे अध्यक्ष आहेत. तर गेल्या 27 वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी नुकतीच नरेंद्र मोदी याच्या जीवनावर अधारित चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. सुभाष मलिक यांनी हा चित्रपट नरेंद्र मोदींच्या 2014 सालापासून पुढील आयुष्यावर अधारित असेल अशी घोषणा केली आहे.
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होता. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. या चित्रपटात बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिस सुमारे अडीच कोटींची कमाई केली होती.





