Richa Chadha : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी रिचा चढ्ढाने चाहत्यांना दिलं गिफ्ट, ‘या’ नव्या चित्रपटाची केली घोषणा; म्हणाली ही प्रेमकथा मी स्वतः लिहिली

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा रिचानेच स्वत: लिहिली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या खास मुहूर्तावर अभिनेत्री रिचाने तिच्या चाहत्यांना हे गिफ्ट दिले आहे. तसेच स्वतःच लिहिलेल्या चित्रपटात ती अभिनय देखील करणार आहे. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार याबद्ल माहिती मिळू शकलेली नाही.
कोरोनाच्या काळात स्वतः या चित्रपटाची कथा लिहिली असून या चित्रपटाचे नाव लास्ट मंडे असे ठेवण्यात आल्याचे रिचाने सांगितले. रिचा एक निर्माती म्हणून खूश नव्हती. यामुळे लॅाकडाऊनच्या काळात तिने एक कथा लिहिली. आता ती स्वतः या चित्रपटात अभिनय करणार आहे. या चित्रपटासाठी रिचा खूप उत्सुक आहे. चित्रपटाची कथा एका टीव्ही रिॲलिटी शोच्या निर्मात्याची आहे. ऑफिसमध्ये कोणीतरी या निर्मात्याला ‘बालिश कॅट लेडी’ म्हणते, तेव्हा ती त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते, अशी वनलाइन स्टोरी या चित्रपटाची असल्याचे रिचाने सांगितले.
कौटुंबिक चित्रपट
रिचा ही एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात वाढली आहे. यामुळे तिचे तिच्या कुटुंबातसोबतच्या अनेक आठवणी आणि अनुभव आहेत. माझ्या सर्व मोठ्या चुलत भावांची लग्ने ठरलेली आहेत. ही कथाही अशीच आहे जी एका कुटुंबाभोवती फिरते, हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांनाही आवडेल.
आखरी सोमवार
तुम्ही 30 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला नोकरी आणि कुटुंब दोन्ही मिळण्याची आशा आहे, परंतु समाजाला वाटते की आता खूप उशीर झाला आहे आणि तुम्ही थकले आहात कारण ही स्वप्ने आता साध्य होणार नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत ती म्हणते ‘आखरी सोमवार’ हा देखील असाच एक चित्रपट आहे, यातली कथा आधी तोडण्याची आणि नंतर एकत्र येण्याची आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्या कॉमिक टायमिंगचा खूप कमी वापर या चित्रपटात केल्याचे तिने सांगितले.





