Upcoming Movies : आता 2028 पर्यंत नो टेन्शन… मनोरंजन होणार तुफान ! मॅडॉक फिल्म्सनं तब्बल ‘इतक्या’ हॉरर-कॉमेडी सिनेमांची केली घोषणा

Upcoming Movies । Maddock Film : ‘मॅडॉक फिल्म्स’ युनिव्हर्स आपल्या हॉरर कॉमेडी चित्रपटांसाठी खास प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षात युनिव्हर्समधून अनेक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ‘स्त्री’, ‘स्त्री 2’ आणि ‘भेडिया’ असे अनेक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत.
अश्यातच आता हॉरर-कॉमेडी, सुपरनॅचरल, ऐतिहासिक आणि अॅक्शन-थ्रिलर सारख्या विविध प्रकारांमध्ये मॅडॉक फिल्म्स आगामी वर्षांमध्ये प्रेक्षकांना नवनव्या अनुभवांसाठी तयार करत आहे.
नुकतंच त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर आगामी 2025 ते 2028 दरम्यान कोणते नवीन चित्रपट प्रदर्शित होणार याची सविस्तर यादी जाहीर केली आहे. त्यामुळे विविध शैली आणि कथा समाविष्ट असणारे चित्रपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा, पाहा तारीख…
या युनिव्हर्सचा दुसरा टप्पा ‘थामा’ सिनेमा पासून सुरू होईल. त्यानंतर 31 डिसेंबर 2025 रोजी ‘शक्तिशालिनी’ प्रदर्शित होईल. यानंतर ‘भेडिया 2’ आणि ‘चामुंडा’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
– ‘भेडिया 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होईल. त्यासोबतचं ‘चामुंडा’ 4 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
– ‘स्त्री 3’ 13 ऑगस्ट 2027 रोजी प्रदर्शित होईल, तर ‘मुंज्या 2’ (महा मुंज्या) 24 डिसेंबर 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.
– ‘पहला महायुद्ध’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2028 रोजी प्रदर्शित होईल, तर ‘दुसरा महायुद्ध’ 18 ऑक्टोबर 2028 रोजी पडद्यावर येणार आहे. हे दोन्ही चित्रपट ऐतिहासिक प्रकारचे असतील आणि जागतिक युद्धांच्या विषयावर आधारित असणार आहेत.





