Emraan Hashmi : मॉर्डन लव्हस्टोरी, डार्क ट्विस्ट, इमरान हाश्मीचा पुढचा पिक्चर असणार खास; अभिनेत्याची दिग्दर्शकासोबत सुरुऐ चर्चा, पण…

अभिनेता इमरान हाश्मीला घेऊन दिग्दर्शक महेश भट्ट यांनी मर्डर चित्रपट 2004 मध्ये रिलीज केला होता. या चित्रपटातून अभिनेता इमरान हाश्मीला लॉन्च करण्यात आले होते. या चित्रपटाने इम्रानला एक वेगळी लोकप्रियता मिळवून दिली.
त्यानंतर इम्रान हाश्मीने राज द मिस्ट्री, गँगस्टर सारखे चित्रपट दिले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटांनी बॅाक्स अॅाफिसवरही चांगली कमाई केली. मिड डेच्या रिपोर्टनुसार, इमरान भट यांच्या ट्विस्टेड म्युझिकल कथेवर काम एका चित्रपटात काम करणार आहे.
विशेष भट्टचा हा दुसरा दिग्दर्शकीय प्रोजेक्टर असणार आहे. यापूर्वी त्याने ‘मर्डर 3’मधून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. हा चित्रपट इमरानसाठी घरवापसीसारखा असणार आहे. मिड डेनच्या सूत्रांच्या हवाल्याने इमरान गेल्या एका वर्षापासून विशेष फिल्म्सच्या कार्यालयात येत आहे. तो आणि विशेष भट्ट एका चित्रपटावर चर्चा करत आहेत.
गेल्या आठवड्यात इम्रान पुन्हा विशेषच्या ऑफिसमध्ये आला होता. दोघांनीही मिळून काही चित्रपट शॉर्टलिस्ट केलेले आहेत.
पण विशेष भट्ट यांना जो चित्रपट फायनल करायचा आहे ती एक मॅार्डन लव्हस्टोरी असणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या स्टोरीमध्ये डार्क ट्विस्ट असणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झाले नसले तरी हा चित्रपट विशेष भट्ट याने लिहिला आहे. सर्व गोष्टी जुळून आल्यास या चित्रपटावर मार्च अखेरपर्यंत काम करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.





