पुष्माची कमाई सुरू असतानाच रश्मिका मंदाना लागली दुसऱ्या चित्रपटाच्या कामाला, ‘या‘ अभिनेत्यासोबत झळकणार

Rashmika Mandanna New Movie: अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेला पुष्पा-2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर अफाट कमाई करत आहे. चित्रपटाने जगभरात 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली आहे. मात्र, एकीकडे पुष्पा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना रश्मिकाने तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरुवात केली आहे.
रश्मिका तिचा आगामी चित्रपट ‘थामा’मध्ये अभिनेता आयुष्मान खुराणासोबत काम करताना दिसेल. दोघांनी त्यांच्या चित्रपटाची माहिती देणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले की, आशा आहे की, तुम्ही ‘थामा-के-दार हॉलिडे’ साजरा करत असाल. भेटूया 2025 मध्ये.’
View this post on Instagram
या पोस्टसोबतच तिने #दिवाली देखील लिहिले आहे. त्यामुळे तिचा हा नवीन चित्रपट वर्ष 2025 मध्ये दिवाळीच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. हा चित्रपट दिनेश विजान यांच्या हॉरर कॉमेडी यूनिव्हर्सचा भाग असेल. स्त्री-2 चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दिनेश विजान हॉरर कॉमेडी यूनिव्हर्समधील हा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.
थामा चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहेत. तर दिनेश विजान आणि अमर कौशिक निर्माते आहेत. या चित्रपटातपरेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी देखील प्रमुख भूमिकेत असतील. दरम्यान, या चित्रपटाआधी चाहत्यांना रश्मिकाला मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. विकी कौशल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 ला रिलीज होणार आहे.





