अजित पवारांवरील आक्षेपार्ह टीकेचा मिटकरींनी घेतला समाचार; हाकेंवर सडकून टीका, म्हणाले” ओबीसी समाजामध्ये…”

Amol Mitkari : महाराष्ट्रातील मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर थेट समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले होते. ‘महाज्योती’ योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
तसेच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि महाज्योती योजनेला निधी मिळावा यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलना दरम्यान हाकेंची अजित पवारांवर बोलतान जीभ घसरली अन् शिवीगाळ करण्यात आल्याची बातमी आली होती.
लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाज्योती योजनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, त्यांनी पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे, ज्यामुळे हे आंदोलन अधिक चर्चेत आले होते. अजित पवार यांच्यावर टीका होताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मिटकरींनी हाकेंवर सडकून टीका केली आहे.
काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात
माझ्या केसाला धक्का लावू नका तुझी केसस नकली आहेत, अशा शब्दात मिटकरींनी हाकेंना सुनावलं आहे. पक्षाच्या माध्यमातून काल युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून हाकेला इशारा देण्यात आला आहे. यावर सविस्तर पक्षाचे प्रांत अध्यक्ष बोलणार आहेत, अशी माहिती मला नुकतीच मिळालेली असल्याचे मिटकरी म्हणाले. आम्ही सगळे आमदार अजितदादांसोबत आहोत, काही गोष्टी आपल्या इतर पक्षांकडून पण शिकण्यासारख्या असतात, असा सल्ला मिटकरींनी दिला आहे.
मला अगदी भरून येतयं मी काय बोलू
सोमण नावाच्या व्यक्तीने राज ठाकरे यांच्यावर अपशब्द करणार एक ट्वीट केले होते. अख्या पक्षाने त्याचं काय करायच ते केलं, फक्त आपली काम अजितदादांकडून होतात, असे म्हणायचे. मला अगदी भरून येतयं मी काय बोलू, मी बोललो तर तिकडून माझा प्रोब्लेम. अप्रत्यक्षपणे अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
फडणवीसांवर काही बोललं तर…
माझ्या नेत्याने मला इथपर्यंत आणलं, त्या नेत्याला गल्लतील गुंड टुकार काहीपण बोलतो. भारतीय जनता पार्टीकडून शिका, देवेंद्र फडणवीसांवर काही बोललं तर अखा पक्ष कामाला लागतो. शिंदेच पण तसेच आहे, असे म्हणत त्यांनी कोणीही या प्रकरणी उघडपणे न बोलण्याने नाराजी व्यक्त केली.
टार्गेट करायचं तर महायुतीला करावं, फक्त अजित दादाच का? असा सवालही मिटकरींनी उपस्थित केला आहे. हे सगळ ठरवून चाललेलं आहे, असा आरोप मिटकरींनी केला आहे. ओबीसी समाजामध्ये अजित दादांची प्रतिमा मलीन करण्याकरता हे कुबांट रचलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा : सेबीकडून अमेरिकन ट्रेडिंग फर्मवर फसवणूकीचा आरोप, घातली बंदी ; ४८४३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त होणार,





