Amol Mitkari : ‘तुमची औxx पाहा, मग अजितदादांवर बोला’; “अमोल मिटकरींचा लक्ष्मण हाकेंना जोरदार प्रत्युत्तर

Amol Mitkari on Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मिटकरी यांनी हाकेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिटकरी म्हणाले की, “लक्ष्मण हाकेंनी आतापर्यंत लढलेल्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या मतांची संख्या पाहावी. 2014 च्या निवडणुकीत सांगोल्यातून लढताना त्यांनी केवळ 527 मते मिळवली होती.”
मिटकरी यांनी हाकेंवर गंभीर आरोप करताना सांगितले की, “2014 च्या निवडणुकीत त्यांनी एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतले होते.” तसेच, “तुमच्याकडे असलेली गाडी जनतेने दिली की स्वतः घेतली, हे जनतेला स्पष्ट करा,” असेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांवर टीका करण्यापूर्वी हाकेंनी स्वतःची औकात पाहावी, असा सल्ला देताना मिटकरी म्हणाले, “मी आमदार झाल्यावर माझ्या गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो, तरी सन्मानजनक मते मिळवली. तुला आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये मिळून साडेसहा हजार मतेही मिळाली नाहीत.”
मिटकरी यांनी पुढे सांगितले की, “लक्ष्मण हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल. मी त्याच्या अंगावर त्याचे अंतर्वस्त्र पण शिल्लक ठेवणार नाही. तुला तुझ्या औकातीतच उत्तर द्यावे लागेल.”
या वादामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळात या वादाची चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना ‘पोल्ट्री फार्मवाले’ संबोधले. गेल्या २० वर्षांपासून अर्थखात्याला चिकटून बसलेल्या अजित पवारांनी भटके-विमुक्त आणि मागासवर्गीय महामंडळांना ‘५० पैसेही’ दिले नसल्याचा आरोप हाके यांनी केला.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाके यांच्या फॉर्च्यूनर गाडीवरून टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर देताना हाके यांनी मिटकरींना ‘बाजारू विचारवंत’ म्हणत, “मी त्यांच्या भाषेत बोललो, तर मिटकरी आणि अजित पवार यांच्या अंगावर कपडे राहणार नाहीत,” असं मिटकरी यांनी म्हटले होते.





