RCB vs LSG : आरसीबीचा ऐतिहासिक विजय! चिन्नास्वामीवर पहिल्यांदाच लखनौला चारली धूळ; विराट कोहलीचं हुकलं अर्धशतक
RCB vs LSG : आयपीएल इतिहासात आरसीबीने पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर लखनौचा पराभव करण्याची किमया साधली आहे

RCB vs LSG Royal Challengers Bengaluru won by 5 Wickets : आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला आहे. घरच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याच्या जोरावर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने लखनऊवर ५ गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासात आरसीबीने पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर लखनौचा पराभव करण्याची किमया साधली आहे.
आरसीबीच्या गोलंदाजांचा कहर –
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा आरसीबीचा निर्णय सार्थ ठरला. लखनौचा डाव सुरुवातीपासूनच गडगडला. एडेन मार्करम (१२) लवकर बाद झाला, तर कर्णधार ऋषभ पंत दुखापतीमुळे ‘रिटायर हर्ट’ झाला आणि नंतर परतल्यावरही केवळ १ धाव काढून बाद झाला. मुकुल चौधरी (३९) आणि आयुष बडोनी (३८) यांनी झुंज दिली.
His first home game and he announces himself with a match-winning performance 🏅
Josh Hazlewood is named the Player of the Match 👏👏#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvLSG | @RCBTweets pic.twitter.com/50ODohqwyv
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2026
लखनौलैछा मिचेल मार्शने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. त्याने ३२ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्यानंतरही आरसीबीच्या माऱ्यासमोर लखनौचा संघ १४६ धावांत गारद झाला. आरसीबीकडून रसिख डारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने ३ आणि कृणाल पंड्याने २ गडी बाद केले.
कोहलीचे वादळ आणि सहज विजय –
As convincing as it gets 🙌
A comfortable 5️⃣-wicket win and @RCBTweets remain unbeaten at home ✌️
Scorecard ▶️ https://t.co/UztAZM9l0q#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvLSG pic.twitter.com/pFkug0okkt
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2026
प्रत्युत्तरात १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने विराट कोहलीला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवले. कोहलीने ३४ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४९ धावांची स्फोटक खेळी करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर रजत पाटीदार (२७) आणि जितेश शर्मा (२३) यांनी आक्रमक फलंदाजी केली. अखेरीस टिम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांनी आरसीबीला १५.१ षटकांतच विजय मिळवून दिला.





