Mitchell Marsh Six : चिन्नास्वामीवर मिचेल मार्शचं तांडव! १०२ मीटर लांब षटकार मारत चेंडू पाठवला स्टेडियमबाहेर; पाहा VIDEO
Mitchell Marsh Six : या सामन्यात मिचेल मार्शने मारलेला षटकार पाहून सर्वच थक्क झाले आहेत. मार्शने भुवनेश्वर कुमारला मारलेला हा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर जाऊन विसावला.

Mitchell Marsh 102m Six IPL 2026 : बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पडणे ही चाहत्यांसाठी नवी गोष्ट नाही, पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील सामन्यात मिचेल मार्शने मारलेला षटकार पाहून सर्वच थक्क झाले आहेत. मार्शने भुवनेश्वर कुमारला मारलेला हा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर जाऊन विसावला.
आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना संथ सुरुवात केली होती, पण सलामीवीर मिचेल मार्शने आपल्या फटकेबाजीने वातावरणात रंगत भरली. तिसऱ्या षटकात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला असता, त्याने एक शॉर्ट चेंडू टाकला. या संधीचा फायदा घेत मार्शने एक जबरदस्त ‘पुल शॉट’ खेळला आणि चेंडू चक्क १०२ मीटर लांब उडवला. चेंडू स्टेडियमची छत पार करून बाहेर पडला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यंदाच्या हंगामातील तिसरा मोठा षटकार –
1⃣0⃣2⃣m MONSTER 😮
Mitchell Marsh sends this into the orbit 🚀
Updates ▶️ https://t.co/UztAZM9l0q#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/sPPaaxDbTw
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2026
मिचेल मार्शचा हा १०२ मीटरचा षटकार आयपीएल २०२६ मधील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा षटकार ठरला आहे. या यादीत आरसीबीचा टिम डेव्हिड (१०६ मीटर) पहिल्या स्थानावर असून कूपर कॉनॉली (१०३ मीटर) दुसऱ्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमच्या छोट्या सीमारेषांचा मार्शने पुरेपूर फायदा उठवला आणि आपल्या ताकदीचे दर्शन घडवले.
अर्धशतक हुकलं, पण झुंज दिली –
लखनौच्या डावात मिचेल मार्शने ४० धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावले. लखनौचा डाव कोसळत असताना मार्शने एक बाजू लावून धरली होती. मात्र, क्रुणाल पंड्याच्या एका वळण घेणाऱ्या जादुई चेंडूवर तो चकवा खाल्ला आणि पायचीत (Clean Bold) होऊन तंबूत परतला. मार्शच्या या आक्रमक सुरुवातीमुळेच लखनौला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.





