LSG vs RR : लखनौचा सलग चौथा पराभव! आर्चर-जडेजासमोर पंतच्या सेनेची उडाली दाणादाण; राजस्थानने नोंदवला पाचवा विजय
LSG vs RR : जोफ्रा आर्चरची भेदक गोलंदाजी आणि रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळी राजस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली.

LSG vs RR Rajasthan Royals register 5th Win : आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सचा (LSG) खराब फॉर्म कायम असून राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या १६० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनौची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि राजस्थानने ४० धावांनी दिमाखात हंगामातील पाचवा विजय मिळवला.
आयपीएल २०२६ मधील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सवर मात करत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. जोफ्रा आर्चरची भेदक गोलंदाजी आणि रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळी राजस्थानच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. दुसरीकडे, सलग चार पराभवांमुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ आता नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
A clinical bowling display to defend the lowest total this season 😯@rajasthanroyals get back to winning ways with a 40-run victory 👏
Scorecard ▶️ https://t.co/5SaPY8wfsc#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRR pic.twitter.com/xv53u4tQVg
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2026
राजस्थानसाठी रवींद्र जडेजा ठरला तारणहार –
4⃣ overs to go
Ravindra Jadeja in the middle for #RR 👊
Will he finish on a high? 🤔
Updates ▶️ https://t.co/5SaPY8wfsc#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRR pic.twitter.com/s31SXB09gQ
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2026
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जैस्वाल (२२) आणि वैभव सूर्यवंशी (८) स्वस्तात बाद झाले, तर ध्रुव जुरेल खातेही उघडू शकला नाही. कर्णधार रियान परागने २० धावा केल्या, मात्र संघ अडचणीत असताना अनुभवी रवींद्र जडेजाने २९ चेंडूंत नाबाद ४३ धावांची खेळी करून राजस्थानला २० षटकांत १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली.
आर्चरचा ‘स्पेल’ अन् लखनौचं ‘पॅक-अप’ –
𝙁𝙡𝙮𝙞𝙣𝙜 𝙅𝙪𝙧𝙚𝙡 ✈️
Sharp reflexes on display from the acrobatic #RR wicket-keeper 🤸♂️
Scorecard ▶️ https://t.co/5SaPY8wfsc#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/TVsBD4VL8r
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2026
प्रत्युत्तरात १६० धावांचे आव्हान लखनौसाठी सोपे वाटत होते, पण जोफ्रा आर्चरने आपल्या ४ षटकांत केवळ २० धावा देत ३ महत्त्वाचे बळी टिपले. लखनऊची अवस्था इतकी वाईट होती की, आयुष बडोनी, कर्णधार ऋषभ पंत आणि एडन मारक्रम हे तिघेही ‘शून्य’ धावांवर बाद झाले. सलामीवीर मिचेल मार्शने ५५ धावांची झुंझाऊ खेळी केली, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. निकोलस पूरनने २२ धावा केल्या, मात्र १८ षटकांत केवळ ११९ धावांवर लखनऊचा डाव आटोपला.
या विजयामुळे राजस्थान रॉयल्स आता प्ले-ऑफच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर लखनौला पुनरागमनासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे.





