Mirabai Chanu Gold : वेटलिफ्टिर मीराबाई चानूने ग्लास्गोत रचला इतिहास! सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
Mirabai Chanu Gold : भारताची स्टार भारोत्तोलक (वेटलिफ्टर) मीराबाई चानूने सुवर्णपदकावर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे.

Mirabai Chanu Wins Gold Medal Weightlifting Glasgow Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारताची स्टार भारोत्तोलक (वेटलिफ्टर) मीराबाई चानूने (Mirabai Chanu) सुवर्णपदकावर (Gold Medal) नाव कोरत नवा इतिहास रचला आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने एकूण १९० किलोग्राम वजन उचलून भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यासह तिने स्नॅच प्रकारात ८५ किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रमही (Games Record) स्थापित केला.
पहिल्या अपयशानंतर नवा गेम्स रेकॉर्ड –
मीराबाई चानूची सुरुवात काहीशी खडतर झाली. स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात ती ८२ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने हे वजन सहज पेलले आणि तिसऱ्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून ८२ किलोचा जुना गेम्स रेकॉर्ड मोडीत काढला. त्यानंतर क्लीन अँड जर्क फेरीत पहिल्या प्रयत्नात १०५ किलो वजन उचलण्यात अपयश आल्यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात १०५ किलो वजन उचलून तिने सुवर्णपदकावर मोहर उमटवली. यात नायजेरियाच्या रूथ असुकुओ न्योंगने रौप्यपदक पटकावले.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णाची ‘हॅटट्रिक’ –
Queen of RECORDS! 🏋️
𝐆𝐨𝐥𝐝 𝐦𝐞𝐝𝐚𝐥. 𝐆𝐚𝐦𝐞𝐬 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝𝐬! 👑
Mirabai Chanu stamps her authority on the 48kg class with a dominant show at the Commonwealth Games Glasgow 2026.
Watch Glasgow 2026, LIVE NOW exclusively on Sony Sports Network TV channels and Sony LIV.… pic.twitter.com/sHxwKkj7cI
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 26, 2026
मीराबाई चानूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. यापूर्वी तिने २०१८ गोल्ड कोस्ट (४८ किलो) आणि २०२२ बर्मिंघम (४९ किलो) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती.
भारताचे एकूण तिसरे पदक –
CWG 2026: PT Usha hugs Weightlifter Mirabai Chanu after the weightlifter clinches gold medal. pic.twitter.com/ee8oNVXaAB
— IANS (@ians_india) July 26, 2026
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक आहे. यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये चनंबम ऋषिकांत सिंहने (६० किलो) रौप्य आणि पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमारने कांस्यपदक जिंकले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती आणि २०१७ ची वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मीराबाईने या पदकासह आपल्या सुवर्णमयी कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.





