Abhishek Worst Record : अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यात अपयशी! नावावर केला भारताचा सर्वात वाईट रेकॉर्ड; एकाच गोलंदाजाने उडवली झोप
Abhishek Worst Record : तिन्ही सामन्यांत दुहेरी धावसंख्याही पार न करू शकल्याने अभिषेकच्या नावावर एका टी-२० मालिकेत सर्वात खराब फलंदाजी करण्याचा नकोसा भारतीय विक्रम नोंदवला गेला आहे.

Abhishek Sharma Poor Form Blessing Muzarabani Record IND vs ZIM 3rd T20I : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या अन् शेवटच्या टी-२० सामन्यातही भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या सामन्यात अवघ्या ४ चेंडूंत २ धावा करून तो झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानीचा (Blessing Muzarabani) शिकार बनला. विशेष म्हणजे, या संपूर्ण मालिकेत तिन्ही सामन्यांत अभिषेकला मुझाराबानीनेच बाद केले. तिन्ही सामन्यांत दुहेरी धावसंख्याही पार न करू शकल्याने अभिषेकच्या नावावर एका टी-२० मालिकेत सर्वात खराब फलंदाजी करण्याचा नकोसा भारतीय विक्रम नोंदवला गेला आहे.
श्रेयस अय्यरचा ७ वर्षे जुना नकोसा रेकॉर्ड मोडला!
अभिषेकने पहिल्या टी-२० मध्ये ८ चेंडूंत १ धाव, दुसऱ्या सामन्यात ८ चेंडूंत ८ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ४ चेंडूंत २ धावा केल्या. अशा प्रकारे तीन सामन्यांच्या या मालिकेत त्याने २० चेंडूंत अवघ्या ११ धावा केल्या. पहिल्या ७ क्रमांकांवर फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही भारतीय फलंदाजाची ही एका टी-२० मालिकेतील सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. या प्रकरणात त्याने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १४ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड मागे टाकला.
मुझाराबानी ठरला अभिषेकचा कर्दनकाळ!
The curse of Blessing for Abhishek Sharma! 🙁pic.twitter.com/dloxWkxVsW
— Cricbuzz (@cricbuzz) July 26, 2026
झिम्बाब्वेच्या मुझाराबानीने अभिषेक शर्माची मोठी कमजोरी जगासमोर आणली आहे. या मालिकेत अभिषेकने मुझाराबानीचे १४ चेंडू खेळले, ज्यावर त्याला १४.२८ च्या सुमार स्ट्राईक रेटने केवळ २ धावा करता आल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मुझाराबानीने अभिषेकला आतापर्यंत ५ वेळा बाद केले आहे. त्याच्या २९ चेंडूंचा सामना करताना अभिषेकने ५८.६२ च्या स्ट्राईक रेटने केवळ १७ धावा केल्या असून २० चेंडू ‘डॉट’ खेळले आहेत.
टी-२० कारकिर्दीत तिसऱ्यांदा अपयशी!
ABHISHEK SHARMA IN THIS T20I SERIES Vs ZIMBABWE:
– 1(8) in first T20I.
– 8(8) in second T20I.
– 2(4) in third T20I. pic.twitter.com/XqtMqjpk81— Tanuj (@ImTanujSingh) July 26, 2026
अभिषेक शर्मा त्याच्या टी-२० कारकिर्दीत तिसऱ्यांदा सलग तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांत दुहेरी धावसंख्या गाठण्यापूर्वीच बाद झाला आहे. सलग तीन डावांमध्ये एकेरी (Single Digit) धावसंख्येवर बाद होणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे.





