बेल्हे, (वार्ताहर)- जुन्नर तालुक्यातील कुरण गावामध्ये मध्ये गणेश गव्हाणे या शेतकऱ्यांनी तुर्की प्रजाती बाजरी आपल्या शेतात पिकवली आहे. साधारणतः तीन फुट लांबीचे कणीस आले आहे. यांची स्वतः नर्सरी असून त्यांनी बारामती कृषी प्रदर्शनातून हे बियाणे आणले होते.
त्यांनी प्रात्यक्षिक स्वःतच्या प्रयोग केला आहे. अगदी तीन फुटाचे बाजरीच कणीस आहे. निश्चितच तिप्पटीने उत्पन्न वाढेल. आपली गावठी बाजरी साधारण त्याचं बारीक कणीस असते.
गव्हाणे हे शेतीमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. नर्सरी, फळबाग, ऊसाच्या नवीन प्रजाती, त्यात कल्पकतेने जैविक खते स्वतः तयार करून वापरतात.
कुरण गावातील शेतकऱ्यांना चालता बोलता शेतीविषयक माहिती देत असतात. त्यांच्या या नवीन प्रयोगाची जुन्नर तालुक्यात चर्चा सुरू आहे.