Michael Vaughan Allegation : ‘हा तर सत्तेचा गैरवापर!’ भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी मायकल वॉनचा आयसीसीवर पक्षपाताचा गंभीर आरोप
Michael Vaughan Allegation : आयसीसीच्या पद्धतीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने जोरदार टीका केली आहे.

Michael Vaughan Bias Allegation ICC before IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, मैदानाबाहेर एका वेगळ्याच वादाने तोंड वर काढले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर परिणाम झाला असताना, विविध देशांच्या खेळाडूंना मायदेशी पाठवण्याच्या आयसीसीच्या पद्धतीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने जोरदार टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मायकल वॉनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरोप केला की, गुरुवारी उपांत्य फेरीत पराभूत झालेला इंग्लंडचा संघ शनिवारी तातडीने चार्टर्ड फ्लाईटने मायदेशी रवाना झाला. मात्र, सुपर ८ फेरीतून गेल्या रविवारीच बाहेर पडलेले वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू अजूनही भारतातच अडकून पडले आहेत.
आयसीसीवर पक्षपाताचा आरोप –
So England got knocked out on Thurs get a charter home today .. West Indies go out last Sunday and are still in Kolkata .. SA in the same position .. That’s where the power is all wrong .. All teams in this situation should be treated the same .. just because you are more…
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 7, 2026
मायकल वॉनने आपल्या पोस्टमध्ये संताप व्यक्त करताना लिहिले, “इंग्लंडचा संघ गुरुवारी बाहेर पडला आणि आज चार्टर्ड विमानाने घरी जात आहे. पण वेस्ट इंडिजचा संघ गेल्या रविवारीच स्पर्धेतून बाहेर झाला असूनही त्यांचे खेळाडू अजूनही कोलकात्यात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचीही अवस्था अशीच आहे. इथे सत्तेचा चुकीचा वापर केला जात आहे. आयसीसीने सर्व संघांना समान वागणूक द्यायला हवी.”
युद्धाचा खेळाडूंवर परिणाम –
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत किंवा त्यांचे मार्ग बदलले आहेत. अशा कठीण परिस्थितीत केवळ एकाच संघाला (इंग्लंडला) प्राधान्य का दिले जात आहे? असा सवाल वॉनने उपस्थित केला आहे. यामुळे क्रिकेट विश्वात आयसीसीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.





