Hardik Pandya Reveals : १२ कोटींची फरारी अन् गाणं मात्र ऐकतोय ‘हे’! हार्दिक पंड्याच्या खुलाशानंतर चाहतेही थक्क, पाहा VIDEO
Hardik Pandya Reveals : हार्दिक पंड्याने नुकताच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक खुलासा केला आहे,

MI Captain Hardik Pandya reveals his spiritual side : मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा हार्दिक पंड्या खऱ्या आयुष्यात कमालीचा धार्मिक आहे. नुकत्याच मुंबई इंडियन्सच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याने आपल्या १२ कोटींच्या आलिशान ‘फरारी १२ सिलिंड्री’ (Ferrari 12 Cilindri) कारबद्दल एक गुपित उघड केले.
हनुमान चालीसा आणि सकारात्मक ऊर्जा –
या कार्यक्रमात हार्दिकसोबत मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड देखील उपस्थित होता. हार्दिकने आपल्या श्रद्धेबद्दल बोलताना सांगितले, “माझ्याकडे फरारी आहे, पण मी कारमध्ये रॉक किंवा पॉप म्युझिकऐवजी ‘हनुमान चालीसा’ ऐकणे पसंत करतो. हनुमान चालीसा जेवढी सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) देते, तेवढी जगातले कोणतेही गाणे देऊ शकत नाही. मी माझ्या फरारीमध्ये हेच ऐकतो आणि हीच खरी ‘कूल’ गोष्ट आहे.” हार्दिकचे हे वाक्य ऐकताच चाहत्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणांनी एकच जल्लोष झाला.
Hardik Pandya said : “I have a Ferrari right now, but even in that I listen to the Hanuman Chalisa. Everyone would agree that no other song can give you the kind of positive energy that the Hanuman Chalisa does.” pic.twitter.com/cF1forQkqs
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 23, 2026
लक्झरी लाईफ आणि संघर्ष –
हार्दिकला महागड्या गाड्या, कपडे आणि घड्याळांची प्रचंड आवड आहे. टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर त्याने ही काळ्या रंगाची फरारी खरेदी केली होती. मुंबईत तो अनेकदा आपली मैत्रीण महिका शर्मा हिच्यासोबत या कारमध्ये फिरताना दिसतो. मात्र, हे यश सहजासहजी मिळालेले नाही. हार्दिकने सांगितले की, २०१३ मध्ये रणजी पदार्पण करण्यापूर्वी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. “जर १२ फेऱ्या मारायला सांगितल्या असतील, तर मी १५ फेऱ्या मारायचो,” अशा शब्दांत त्याने आपल्या कष्टाचा प्रवास उलगडला.
हार्दिक पंड्या आता २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या ‘आध्यात्मिक’ बाजूमुळे सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.





