Ganeshotsav 2026: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण
Ganeshotsav 2026: महिलांनी अथर्वशीर्ष पठण करत स्त्रीशक्तीचा जागर केला.

Ganeshotsav 2026: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. तब्बल ३५ हजार महिलांनी सामूहिकरीत्या अथर्वशीर्ष पठण करत गणरायाचा जयघोष केला. ‘ॐ नमस्ते गणपतये’, ‘मोरया मोरया’ आणि ‘ॐ गं गणपतये नमः’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
ऋषिपंचमीनिमित्त आयोजित या सोहळ्यात पहाटे महिलांनी अथर्वशीर्ष पठण करत स्त्रीशक्तीचा जागर केला. शंखनादाने या भव्य सोहळ्याला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या शंखनादाने झाली. त्यानंतर ओंकार जपाने वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. (Ganeshotsav 2026)
गेल्या ४० वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे राबवला जात आहे.
दरवर्षी ऋषिपंचमीनिमित्त सुमारे ३५ हजार महिला एकत्र येत अथर्वशीर्ष पठण करतात. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. (Ganeshotsav 2026)





