Manoj Jarange : मुंबईतील आंदोलनबंदीवरून जरांगे पाटील भडकले; म्हणाले, रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही
Manoj Jarange : मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्टपासून उपोषण करण्याची घोषणा करत त्यांनी गरज पडल्यास पुन्हा मुंबईच्या दिशेने मोर्चा वळवण्याचा इशारा दिला आहे. दक्षिण मुंबईतील आंदोलनांबाबत सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधांवरून जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. (Manoj Jarange)
मुंबईत येण्यापासून रोखणं म्हणजे दादागिरी
आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चांना मनाई करण्यात आली आहे. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, मराठे मुंबईत येणार असल्यामुळेच सरकारने हे नियम लागू केले आहेत. (Manoj Jarange)
कायदा आणि सत्ता आम्ही तुमच्या हातात दिली, पण तुम्ही त्याचा गैरवापर करता, असा आरोप त्यांनी केला. मुंबईत येऊ नका असं सांगणं ही सरकारची दादागिरी असल्याचंही त्यांनी म्हटलं. (Manoj Jarange)
रेल्वे फिरू देणार नाही, विमानं उडू देणार नाही
आंदोलनाला विरोध केल्यास रेल्वे फिरू देणार नाही, तुमची विमानं उडू देणार नाही, असा आक्रमक इशारा जरांगे यांनी दिला. मुंबईत जाण्याचं ठरलं तर आपण जाणारच आणि रात्रंदिवस आंदोलन करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. परवानगीसाठी अर्ज दिला असून सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा पुढील निर्णय आपण घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Manoj Jarange)
आमचे प्रश्न सोडवा, मग मुंबईत अडथळा येणार नाही
तुम्हाला मुंबईत अडथळा नको असेल तर आमचे प्रश्न सोडवा. प्रश्न सोडवायचे नसतील तर सत्तेतही बसू नका, असा थेट संदेश जरांगे यांनी सरकारला दिला. दरम्यान, मुंबईतील नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागू शकतो, मात्र “आम्ही तुमचेच आहोत” असं सांगत त्यांनी मुंबईकरांनी सहकार्य करण्याचं आवाहनही केलं. (Manoj Jarange)
Manoj Jarange : मोठी बातमी ! मनोज जरांगेची तब्येत पुन्हा बिघडली






