Pune News : दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे जेरबंद
Pune News : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात मेथेनॉलमिश्रित बनावट दारू प्यायल्याने २२ जणांचा बळी गेल्याच्या धक्कादायक प्रकरणातील मुख्य सूत्रधार दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) बुधवारी अटक केली.

Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेथेनॉलमिश्रित बनावट दारू प्यायल्याने २२ जणांचा बळी गेल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बुधवारी अटक केली. गुन्हे दाखल झाल्यानंतर लोंढे फरार होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेत सीआयडीच्या हवाली केले. (Pune News)
सीआयडीचे प्रमुख सुनील रामानंद यांनी याबाबत माहिती दिली. दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे हा या प्रकरणातील मुख्य संशयित असून, गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला पकडले आणि सीआयडीच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे रामानंद यांनी सांगितले. (Pune News)
या प्रकरणात सीआयडीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींसह अद्याप फरार असलेल्या आरोपींवरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune News)
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी-दापोडी परिसरात मेथेनॉलमिश्रित बनावट दारू प्यायल्याने २२ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच पुण्यातील हडपसर परिसरातही चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांप्रकरणी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुढील तपासासाठी दोन्ही प्रकरणे राज्य सीआयडीकडे वर्ग करण्यात आली. (Pune News)
१५ जणांना अटक…
या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सीआयडीने आतापर्यंत १५ आरोपींना अटक केली आहे. आता मुख्य संशयित दत्ता ऊर्फ भाऊ लोंढे यालाही जेरबंद करण्यात आल्याने बनावट दारूच्या या रॅकेटमागील सूत्रधार आणि संपूर्ण साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. (Pune News)
Crime News : लाखणगाव वनक्षेत्रात ‘रात्रीस खेळ चाले’





