Accident News : पेट्रोल संपलं अन् महामार्गावर कार बंद पडली; पाठीमागून कंटेनरची जोरदार धडक, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
Accident News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरजवळील दभाषी गावाजवळ तापी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.

Accident Newst : मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूरजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. पेट्रोल संपल्याने महामार्गावर बंद पडलेल्या कारला पाठीमागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. (Accident News)
या अपघातात एका महिलेचा हात शरीरापासून वेगळा झाला, तर मदतीसाठी आलेल्या नातेवाईकांसह एकूण ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accident News)
नेमकं काय घडलं?
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दभाषी गावाजवळ तापी नदीवरील पुलावर शिरपूरहून धुळ्याकडे जाणारी कार पेट्रोल संपल्यामुळे बंद पडली होती. कारमधील प्रवाशांच्या मदतीसाठी काही नातेवाईक दुचाकीवरून पेट्रोल घेऊन घटनास्थळी आले. (Accident News)
मध्यरात्रीच्या अंधारात कारमध्ये पेट्रोल भरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधाव कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. कंटेनरने कारला काही अंतर फरफटत नेल्याने कारचे मोठे नुकसान झाले. (Accident News)
६ जण गंभीर जखमी
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले.(Accident News)
दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून शिरपूर पोलिसांकडून अज्ञात कंटेनर चालकाचा शोध सुरू आहे. अपघात नेमका कसा झाला, याचा पुढील तपास केला जात आहे. (Accident News)
Accident News : मोठी बातमी..! कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर





