Manoj Jarange : मनोज जरांगेंचा 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौरा; मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेणार
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ७ डिसेंबरपासून राज्यव्यापी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे.

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या 7 डिसेंबरपासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला संबंधित मागण्यासाठी काहीकाळ अवधी दिला आहे. (Manoj Jarange)
मात्र, राज्यातील मराठा बांधवांच्या आरक्षण प्रमाणपत्राच्या समस्या आणि कुणबी कास्ट व्हॅलिडीटीच्या अडचणींबाबत अद्यापही विद्यार्थ्यांना, उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी जरांगे दौरा करणार आहेत. (Manoj Jarange)
7 डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, राज्यातील विविध जिल्ह्यांना ते भेटी देणार आहेत. चार ते पाच टप्प्यांत हा दौरा होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस देण्यात येणार आहे. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. (Manoj Jarange)
ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही. यासह प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या विविध अडचणी जरांगे प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जाणून घेणार आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी मराठा बांधवांनी दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून मांडाव्यात, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे. (Manoj Jarange)
Manoj Jarange : विदर्भ-मराठवाड्याचं राजकारण फिरणार? मनोज जरांगे यांची मोठी घोषणा





