Manoj Jarange : विदर्भ-मराठवाड्याचं राजकारण फिरणार? मनोज जरांगे यांची मोठी घोषणा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या विदर्भ दौऱ्यावर असून वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे त्यांनी अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) सध्या विदर्भ दौऱ्यावर असून वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे त्यांनी अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या भेटीदरम्यान जरांगे (Manoj Jarange) यांनी बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज आणि धर्मगुरू सुनील महाराज यांची भेट घेतली. एकांतात तब्बल वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बंद दाराआड बैठकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय समीकरणांवरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे यांनी तीव्र संघर्ष उभारला असून त्यांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. नुकतेच त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच करत उपोषणाचा पवित्रा घेतला होता; मात्र काही मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
अशा नाजूक टप्प्यावर त्यांनी बंजारा समाजाच्या सर्वोच्च पीठावर जाऊन घेतलेली ही गुप्त भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विदर्भासह मराठवाड्यातही बंजारा समाजाची लोकसंख्या मोठी असल्याने या बैठकीमुळे मराठा आणि बंजारा ही दोन मोठी सामाजिक समीकरणे एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बैठक संपल्यानंतर जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात आणि देशात बंजारा समाजाची मोठी ताकद असून त्यांनाही आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
बंजारा समाजाच्या बांधवांनी केवळ ऊसतोड कामगार म्हणूनच जगायचे का? त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यायचे नाही का? आणि मराठा-बंजारा बांधवांनी कायम शेतातच राबायचे का? असा सवाल करत जरांगे यांनी बंजारा आरक्षणाचा लढा पुढे नेण्याची खुली घोषणा (Manoj Jarange) केली. या अनपेक्षित घडामोडीमुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सामाजिक व राजकीय समीकरणांना आता कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





