Rajasthan Royals : राज कुंद्रा पुन्हा वादात! राजस्थान रॉयल्सच्या मालकाचा ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप

Rajasthan Royals Raj Kundra Faces Blackmail Allegations : उद्योजक राज कुंद्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे मालक मनोज बडाले यांनी कुंद्रावर ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप लावला आहे. हा वाद कुंद्राच्या राजस्थान रॉयल्समधील पूर्वीच्या हिस्सेदारीशी संबंधित आहे. बडाले यांनी याबाबत लंडन हायकोर्टात खटला दाखल केला आहे, ज्यामुळे क्रिकेट आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बडाले यांच्या मते, कुंद्रा यांनी संघातील त्यांच्या मालकीच्या हिस्सेदारीसंदर्भात धमक्या दिल्या आणि ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला. यामुळे संघाच्या व्यवस्थापनावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, ते निराधार आणि खोटे असल्याचा दावा केला आहे. कुंद्रा यांनी आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, हा त्यांच्याविरुद्धचा कट आहे आणि ते कायदेशीर लढाई लढणार आहेत.
काय आहे वाद?
राजस्थान : मनोज बडाले ने राज कुंद्रा पर ब्लैकमेलिंग का आरोप लगाते हुए लंदन हाईकोर्ट में मामला दर्ज किया है। यह विवाद कुंद्रा की टीम में पहले की हिस्सेदारी को लेकर है। #Mktalks #MohsinKhan #mohsinkhan #ManojBadale #RajKundra #RajasthanRoyals #IPLControversy #Blackmail #IPL2025 pic.twitter.com/jqK8Yf6E1K
— MK Talks (@Mykindoftalks) June 26, 2025
राज कुंद्रा यांच्यावर २०१५ मध्ये आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीचा आरोप झाला होता. यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. या घोटाळ्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. दोषी ठरल्यानंतर कुंद्रा यांना त्यांची ११.७ टक्के हिस्सेदारी सोडावी लागली होती. बडाले यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, कुंद्रा यांनी गेल्या महिन्यात आपल्या नियोक्त्याला अचानक ईमेल पाठवला.
हेही वाचा – Usman Khawaja : उस्मान ख्वाजाचा धक्कादायक निर्णय; सेन टीव्हीला मुलाखतीस दिला नकार, काय आहे कारण?
या ईमेलमध्ये त्यांनी असा आरोप केला की, त्यांना ‘फसवले गेले आणि त्यांच्या ११.७ टक्के हिस्सेदारीच्या खऱ्या मूल्यापासून वंचित ठेवले गेले.’ यापूर्वी २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणि २०२१ मध्ये अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते, ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती. या नवीन आरोपांमुळे त्यांच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणात लंडन हायकोर्टात सुनावणी होणार असून, याचा परिणाम राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनावर आणि आयपीएल २०२५ च्या तयारीवर होऊ शकतो. क्रिकेट चाहते आणि विश्लेषक या खटल्याच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. कुंद्रा आणि बडाले यांच्यातील हा कायदेशीर वाद कशाप्रकारे पुढे जाईल, याबाबत सध्या उत्सुकता आहे.





