Usman Khawaja : उस्मान ख्वाजाचा धक्कादायक निर्णय; सेन टीव्हीला मुलाखतीस दिला नकार, काय आहे कारण?

उस्मान ख्वाजा पुन्हा वादात सापडला –
ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १८० धावांत गारद झाला. यात सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या ४७ धावांचा समावेश होता. सामन्याच्या दिवसअखेरीस सेन टीव्हीला मुलाखत देणे अपेक्षित होते, परंतु ख्वाजाने ती देण्यास नकार दिला. यामागचे कारण सेन टीव्हीचा फिलिस्तीनशी संबंधित एक निर्णय होता.
🚨 Usman Khawaja refused to give an interview to SEN Radio, which fired Peter Lalor for speaking out in favor of Gaza. (Sydney Morning Herald) pic.twitter.com/itbMjQ3nYs
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) June 26, 2025
खरेतर, ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता, तेव्हा सेन टीव्हीने ऑस्ट्रेलियाचा स्वतंत्र पत्रकार पीटर लेलोर याला फिलिस्तीनच्या मुद्द्यावर केलेल्या टिप्पणीमुळे नोकरीवरून काढून टाकले होते. पीटर लेलोर याला पाठिंबा दर्शवण्यासाठीच ख्वाजाने ही मुलाखत देण्यास नकार दिला.
सेन टीव्हीचा लोगो पाहून ख्वाजाचा मुलाखतीस नकार –
सामन्यानंतर सेन टीव्हीचे ब्रॉडकास्टर भरत सुंदरन आणि अॅडम कोलिन्स यांनी उस्मान ख्वाजाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सेन टीव्हीचा लोगो पाहून मुलाखत देण्यास नकार दिला. या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ख्वाजा २०२३ पासून गाझाच्या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत आहे. दोन वेळा त्याने आपल्या बुटांवर पॅलेस्टाईनसाठी संदेश लिहून फलंदाजी केली आहे. यासाठी त्याला आयसीसीकडून आधीच ताकीद मिळाली आहे. तरीही, उस्मान ख्वाजाने स्पष्टपणे बोलणे थांबवले नाही.





