ITTF Rankings : मनिका बत्राची क्रमवारीत मोठी झेप! प्रथमच टॉप-25 मध्ये मिळवले स्थान…

ITTF World Team Rankings :- सौदी स्मॅशमधील यशानंतर महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट एकेरी क्रमवारीत २४ व्या स्थानावर पोहोचली असून जागतिक क्रमवारीत टॉप-२५ मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पॅडलर बनली आहे.
२८ वर्षीय खेलरत्न पुरस्कार विजेती, सौदी स्मॅश स्पर्धेपूर्वी जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर होती. या स्पर्धेत जेद्दाह येथे तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली अणि १५ स्थानांनी झेप घेत २४ व्या स्थानावर पोहोचली.
२०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारातील सुवर्णपदक विजेत्या मनिकाने सौदी स्मॅशमध्ये अंतिम आठमध्ये प्रवेश करताना अनेक वेळच्या विश्वविजेता आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या, द्वितीय मानांकित चीनच्या वांग मन्यु हिला धक्का दिला होता. या स्पर्धेत एका भारतीय महिला खेळाडूने या स्पर्धेत एवढी मजल मारण्याची ही पहिलीच वेळ होती. ड्रॉद्वारे मनिकाच्या वाढीमुळे तिला ३५० गुण मिळाले.
मागील वर्षी हँगझोऊ येथे महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय पॅडलर बनून इतिहास रचणाऱ्या मनिकाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याचे तिचे लक्ष्य असल्याने तिची क्रमवारीत वाढ योग्य वेळी झाली आहे.





