नगर – नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकासमोर असलेल्या उज्ज्वल कॉम्प्लेक्स इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बुधवारी (दि.६) दुपारी अचानक आग लागली. मैदानात असलेले वाळलेले गवत, कचरा यामुळे धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. या आगीत फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.
माळीवाडा बसस्थानकासमोर असलेल्या उज्वल कॉम्प्लेक्स मोकळ्या जागेत इमारतीच्या पाठीमागील बुधवारी अचानक धूर दिसू लागला हे नागरिकांच्या निदर्शनास तातडीने महापालिकेच्या अग्निशामक दलास माहिती दिली. ही माहिती मिळताच अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह पथक व अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
या जवानांनी पाण्याचा मारा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या ठिकाणी वाळलेला पालापाचोळा, कचरा तसेच काही व्यावसायिकांनी प्लास्टिकचे पाईप ठेवलेले होते.
सध्या उष्णता वाढू लागल्याने कॉम्प्लेक्स वाळलेल्या पालापाचोळ्याने तात्काळ पेट घेतला. त्यामुळे आग वेगाने फैलावत होती मात्र अग्निशामक दल वेळीच लागल्याने या ठिकाणी आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी नियंत्रण तातडीने महापालिकेच्या अग्निशामक दलाला आहे. पोहोचले व त्यांनी आगीव मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.