BWF Swiss Open 2024 : किदांबी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत, सिंधू व लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात…

BWF Swiss Open 2024 :– दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू व लक्ष्य सेन यांचे स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्याने संपुष्टात आले. मात्र, द्वितीय मानांकित मलेशियाच्या लीझी जियाचा २१-१६,२१-१५ असा पराभव करत किदांबी श्रीकांत याने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
श्रीकांतसह प्रियांशु राजावत व किरण जॉर्ज यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. सिंधूला 17 वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन जपानच्या तोमोका मियाझाकीकडून २१-१६, १९-२१,१६-२१ असा पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्यचा ली चिया हाओने अवघ्या ३८ मिनिटांत २१-१७,२१-१५ अशा फरकाने पराभव केला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/there-has-never-been-a-captain-like-mahendra-singh-dhoni-nor-will-there-be/
दुसरीकडे, राजवतने राजावतने चीनच्या लेई ला शीचा २१-१४,२१-१३ अशा फरकाने पराभव केला. तर जॉर्जने फ्रान्सच्या अँलेक्स लॅनियरला १८-२१,२२-२०, २१-१८ अशी मात दिली. आता श्रीकांतचा सामना ली चिया हाओशी होईल तर राजावत आता चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनशी खेळेल. जॉर्जचा सामना डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेशी होणार आहे.





