BWF Swiss Open 2024 : किदाम्बी श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत….

Swiss Open Badminton 2024 :- स्विस ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत शनिवारी अनुभवी भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का बसला. यासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्विस ओपनमध्ये आपली मोहीम सुरू ठेवणारा श्रीकांत हा शेवटचा भारतीय शटलर होता.
भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांतचा तैवानच्या ‘लिन चुन-यी’ याने एक तास पाच मिनिटे चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 21-15, 9-21, 18-21 असा पराभव केला. दरम्यान, 2022 सालच्या हिलो ओपन सुपर 300 नंतर जर्मनीतील BWF टूर इव्हेंटमध्ये 31 वर्षीय श्रीकांतने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मजल मारण्याची ही पहिलीच वेळ होती. श्रीकांतने नोव्हेंबर 2022 नंतर प्रथमच BWF सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.
श्रीकांतने पहिल्या गेममध्ये सामन्याची सुरुवात चांगली करत सुरुवातीला आघाडी घेतली. यानंतर श्रीकांतने ती 11-5 अशी वाढवली आणि 21-15 असा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही श्रीकांतने पुन्हा एकदा सुरुवातीपासूनच 4-1 अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर लिनने आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि पुढील नऊपैकी आठ गुण जिंकून 9-5 अशी आघाडी घेतली आणि गेम 21-9 ने जिंकला आणि बरोबरी साधली.
अंतिम गेममध्ये लिनने चांगली सुरुवात करून 6-2 अशी आघाडी घेतली पण श्रीकांतने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. 6-6 असा स्कोअर झाल्यानंतर दोघेही पूर्ण मेहनत घेत होते. दोन्ही शटलर्स एकमेकांना तुल्यबळ स्पर्धा देत होते. मात्र, 16-16 अशी बरोबरी राहिल्यानंतर लिनने सलग तीन गुण जिंकून गुणसंख्या 19-16 अशी केली. त्यांनतर आपला खेळ शेवटपर्यत चांगला ठेवत अंतिम गेम 21-18 ने जिंकत अंतिम फेरी गाठली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/banvsl-1st-test-brilliant-comeback-to-test-cricket-for-kamindu-mendis-who-smashes-twin-centuries-in-sylhet/
भारतीय मोहीम संपली…
स्विस ओपनमध्ये आपली मोहीम सुरू ठेवणारा श्रीकांत हा शेवटचा भारतीय शटलर होता. प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडले, तर महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीलाही उपांत्यपूर्व फेरीतूनच हार पत्करावी लागली. महिला एकेरीत पीव्ही सिंधूची मोहीम दुसऱ्या फेरीत संपुष्टात आली.





