Narahari Jirwal : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांना अजित दादांची उणिव भासत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal )यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना करा, अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित दादा आणि शरद पवार यांच्यात बैठका सुरू होत्या, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादीची घोषणा लवकरच होईल असे मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आगामी काही दिवसांत एकत्र आल्यास राजकीय समीकरणे पुन्हा बदलतील. त्यामुळे नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Indian economic zone Bangladesh: शेख हसीना यांच्या दिल्लीतील भाषणाने बांगलादेशचा तिळपापड ; भारताविरुद्ध घेतला आणखी एक मोठा निर्णय नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवाळ? “गेल्या काही दिवसांपासून अजितदादा आणि शरद पवार यांच्यात बैठक होत होत्या. त्यामुळे आता इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चितच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.” असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या आशा पाल्लवित झाल्या आहेत. पुढे बोलताना झिरवाळ म्हणाले, लवकरच दोन्ही पक्ष एकत्र होतील. आता राज्यभरातील जे नेते शरद पवारांना भेटायला जातील ते कदाचित आपली भावना त्यांच्यासमोर मांडतील असे मला वाटते. शरद पवार यांचे वय पाहता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे देखील झिरवाळ म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात यावी अशी मागणी झिरवाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्यानंतर आता पक्षाची धुरा कोण सांभाळणार यावर देखील चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभीवर बोलताना झिरवाळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर देशपातळीवर दादांच्या जागेवर सुप्रियाताई असतील किंवा प्रफुल पटेल असतील. कारण देशात ज्यांनी काम केले आहे, त्यांनाच पुढे केले जाईल. सुनेत्रा पवार यांच्या विषयी नरहरी झिरवाळ काय म्हणाले होते? अनेकांचं म्हणणं आहे की, सुनेत्राताईंना अजितदादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री करावे. पवार कुटुंब पुढे असेल तरच आपला टिकाव आहे. मी एका विभागाचा मंत्री आहे. मी माझ्या मतदारसंघाचे फार फार तर माझ्या जिल्ह्याचे काम करू शकतो. पण ज्या पटीने त्यांनी काम केले तसे काम कोणीच करू शकत नाही. त्यामुळे दादांच्या जागी सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावे, अशीच चर्चा असल्याचे झिरवाळ म्हणाले होते. हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी; राज्य सरकारने दिले आदेश