Ajit Pawar : उभ्या महाराष्ट्राचं काळीज चिरणारं चित्र.! कायमचे शांत झोपलेले ‘दादा’ आणि एकटक पाहणारे शरद पवार, VIDEO

Ajit Pawar : पोलिसांनी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी खाली ठेवले. त्याच्या अगदी समोर शरद पवार हे बसलेले होते.

Updated On:

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. आज (२९ जानेवारी) त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे पार्थिव आज सकाळी काहीवेळ त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते.

त्यानंतर काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान येथे आली तेव्हा याठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले त्यावेळी याठिकाणी शोकाकुल वातावरण होते.

अजित पवार  (Ajit Pawar) यांच्या पार्थिवावसह पवार कुटुंबातील सर्वजण याठिकाणी आले. पोलिसांनी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी खाली ठेवले. त्याच्या अगदी समोर शरद पवार हे बसलेले होते. यावेळी ते एकटक अजित पवार यांच्या पार्थिवाकडे बघत होते. अजित पवार यांचा निपचित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार, हे चित्र महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारे ठरले.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Raut : "शरद पवारांची कृती शिवसेनेला दुखावणारी"; शिंदेंच्या दालनातील बैठकीवर संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया

2026-07-09 11:59:23

Sanjay Raut : "शरद पवारांची कृती शिवसेनेला दुखावणारी"; शिंदेंच्या दालनातील बैठकीवर संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया

Rohit Pawar : गैरहजर असल्याने नाराज असल्याची चर्चा! रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले "सरकारविरोधात आम्ही ठाम.."

2026-07-09 08:43:36

Rohit Pawar : गैरहजर असल्याने नाराज असल्याची चर्चा! रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले "सरकारविरोधात आम्ही ठाम.."

Hingoli : हिंगोलीकरांची झोप उडाली! दोन तासांत चार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

2026-07-09 08:12:22

Hingoli : हिंगोलीकरांची झोप उडाली! दोन तासांत चार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

2026-07-09 05:30:41

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

2026-07-08 19:19:53

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल