Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी; राज्य सरकारने दिले आदेश
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली जात होती.
अखेर राज्य सरकारने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेत सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीत काय काय समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे. तसेच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
२८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा धक्का देणारा ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या पाच जणांचा देखील मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्रसह देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. काल २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्यावर शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्रीय स्तरावर सुरू आहे. ही चौकशी मुख्यतः नागरी विमान वाहतूक मंत्रालय (Ministry of Civil Aviation – MoCA) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या संस्थांमार्फत केली जात आहे. AAIB ही केंद्रीय संस्था विमान अपघातांच्या तपासासाठी जबाबदार असते. AAIB चे डायरेक्टर जनरल आणि दिल्लीतील तीन सदस्यांचे पथक अपघातस्थळी दाखल झाले आहे. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.
DGCA मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे तीन सदस्यांचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले. DGCA ने प्राथमिक माहिती जारी केली, ज्यात पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मधील संवाद, दृश्यमानता (visibility) कमी असणे, आणि शेवटचे संदेश “runway not in sight”, “Oh शेटचा उल्लेख आहे.
अपघातानंतर दुसऱ्या दिवशी २९ जानेवारी ब्लॅक बॉक्स सापडला असून तो ताब्यात घेण्यात आला. त्याचे विश्लेषण करून अपघाताचे नेमके कारण जसे की पायलटची चूक, कमी दृश्यमानता, तांत्रिक बिघाड, धावपट्टीवरील समस्या इत्यादी बाबींची पडताळणी केली जाणार आहे.
हा अपघात इतका भीषण होता की VSR वेंचर्स लिमिटेड लियर जेट 45 विमानाचं तीन तुकडे झाले. लँडिंगच्या काही तास आधी नियंत्रण बिघडलं आणि विमानाचा भीषण अपघात झाला. आता राज्य सरकारने देखील या विमान अपघात प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पुढे काय होणार याकडे लक्ष असणार आहे.






