Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; थेट घरातूनच विरोध, बंधूराज आक्रमक
Omraje Nimbalkar : खासदार ओमराजे यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या काही स्थानिक नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाकडून आता तीव्र आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

Omraje Nimbalkar : धाराशिवच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती आणि त्यानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात आता त्यांचेच बंधू मकरंदराजे निंबाळकर आक्रमक झाले असून, त्यांनी ओमराजेंना थेट आव्हान दिलं आहे. (Omraje Nimbalkar)
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनीही शिंदे गटाची वाट धरली, तर कळंबमधील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (Omraje Nimbalkar)
या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मकरंदराजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ओमराजेंवर गंभीर आरोप करत, ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांना फोडण्याची गरज नव्हती, असं म्हटलं. (Omraje Nimbalkar)
तसंच, “मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी,” असं थेट आव्हान मकरंदराजे निंबाळकर यांनी दिलं आहे. (Omraje Nimbalkar)
दरम्यान, आपल्या शिवसैनिकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे निंबाळकर कुटुंबातील या राजकीय संघर्षामुळे धाराशिवच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. (Omraje Nimbalkar)
आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो आणि मकरंदराजे यांच्या आव्हानाला ओमराजे निंबाळकर काय उत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Omraje Nimbalkar)
Omraje Nimbalkar : शिवसेना प्रवेशानंतर ओमराजेंना पहिला धक्का? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?






