Omraje Nimbalkar : कृष्ण-मराठवाडा सिंचन योजना राष्ट्रीय प्रकल्प घोषित करा; खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मागणी
Omraje Nimbalkar : दुष्काळ रोखण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या कृष्ण-मराठवाडा उपसा सिंचन योजनेला (लिफ्ट इरिगेशन स्कीम) राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बुधवारी केली आहे.

Omraje Nimbalkar : दुष्काळ रोखण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या कृष्ण-मराठवाडा उपसा सिंचन योजनेला (लिफ्ट इरिगेशन स्कीम) राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बुधवारी केली आहे. (Omraje Nimbalkar)
राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.
शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कृष्ण-मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पाबाबत ही विनंती केली. (Omraje Nimbalkar)
कृष्ण-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळावा, ही माझी मुख्य मागणी होती. यामुळे केंद्राकडून निधी उपलब्ध होईल आणि कामाला गती मिळेल. आपल्या मतदारसंघासाठी केंद्रीय विद्यालय स्थापन करण्यासह इतर मागण्याही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Omraje Nimbalkar)
आमच्याकडे राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे सेवांची चांगली जोडणी (कनेक्टिव्हिटी) उपलब्ध आहे. लॉजिस्टिक्स हब उभारण्यासाठी हा जिल्हा आदर्श ठरू शकतो. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या मुद्द्यांवर चर्चा केली आणि आगामी संसदेच्या अधिवेशनात यावर विचार केला जाऊ शकतो, असे सांगितले, असे राजेनिंबाळकर म्हणाले. (Omraje Nimbalkar)
तसेच, धाराशिव जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्याचा दर्जा हटवून त्याला अधिक समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले. कृष्ण-मराठवाडा सिंचन प्रकल्प ही एक मोठी उपसा सिंचन योजना आहे. (Omraje Nimbalkar)

या योजनेद्वारे कृष्णा नदी खोऱ्यातील २३.६६ टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) पाणी धाराशिवसह आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दुष्काळग्रस्त मराठवाडा भागात वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Omraje Nimbalkar)





