Vivek Bhimanwar : MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सर्वात मोठा धक्का; देवेंद्र फडणवीसांनी उचललं मोठं पाऊल
Vivek Bhimanwar : पुण्यात सुरु असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाची अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Vivek Bhimanwar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे विनंती केली आहे. (Vivek Bhimanwar)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांना शिफारस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. (Vivek Bhimanwar)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्यापूर्वी त्यांची चौकशी करावी लागते, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांना केली आहे. (Vivek Bhimanwar)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं आहे. तीन विद्यार्थ्यांना पेपरचा लाभ झाल्याचं समोर आलं होतं. या तीन विद्यार्थ्यांसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. (Vivek Bhimanwar)
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.यासाठी पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात पुण्यात आंदोलन सुरु आहे. याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न पॅटर्न की वर्णनात्मक प्रश्न पॅटर्नवरुन देखील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. पुण्यात एकूण तीन ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. (Vivek Bhimanwar)
महेंद्र हरपाळकर यांची बदली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी,क्लासचालकांची बैठक झाली होती. त्याबैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार महेंद्र हरपाळकर यांना एमपीएससीच्या सचिव पदावरुन कार्यमुक्त करण्यात आलं आहे. (Vivek Bhimanwar)
विवेक भीमनवार आयोगात कधी आले?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची डिसेंबर 2025 मध्ये नियुक्ती करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी कार्यभार मार्च 2026 मध्ये स्वीकारला होता. (Vivek Bhimanwar)






