Maharashtra Politics : महायुतीत मोठा भडका? भाजप आक्रमक; थेट युतीतून बाहेर पडण्याचा दिला इशारा
Maharashtra Politics : मनसे आणि भाजपमधील राजकीय वाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) महायुतीच्या सत्तासमीकरणावर परिणाम करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : मनसे आणि भाजपमधील राजकीय वाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) महायुतीच्या सत्तासमीकरणावर परिणाम करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics)
मनसे नेत्यांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांवरून भाजपमध्ये नाराजी वाढली असून, मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे KDMC मधील महायुतीच्या सत्तासमीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसेला महायुतीतून बाहेर काढले नाही, तर भाजप विरोधी पक्षात बसणार असल्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
महायुतीतून मनसेला बाहेर काढण्याची मागणी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीमध्ये मनसेचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेमध्ये विविध मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले आहेत. त्यातच अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या घटनेनंतर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. (Maharashtra Politics)
‘भाजपच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली असून, मनसेसोबत सत्तेत बसण्यासही विरोध दर्शवण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
महायुती टिकवायची असेल तर मनसेला तातडीने युतीतून बाहेर काढावे, अशी मागणी भाजपने शिवसेनेकडे केल्याची माहिती आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र लिहून मनसेसोबतची युती तोडण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics)
मनसेसोबत युती नाही तर भाजप विरोधात बसणार?
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपच्या गटनेता कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मनसेसोबतची युती कायम राहिल्यास भाजपने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
भाजपच्या या भूमिकेमुळे KDMC मधील महायुतीच्या सत्तासमीकरणाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेला महायुतीत कायम ठेवायचे की भाजपच्या मागणीनुसार मनसेला बाहेरचा रस्ता दाखवायचा, याबाबत आता शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Maharashtra Politics)
अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवला आणि वादाला सुरुवात
मनसेचे नेते अमित ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि महाविद्यालयातील सुविधांची पाहणी केली. (Maharashtra Politics)
यावेळी त्यांनी कॅन्टीनमधील जेवण तसेच खेळाडूंना प्रशिक्षक उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरून महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याचवेळी एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. (Maharashtra Politics)
यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो त्या ठिकाणाहून हटवण्यास सांगितले आणि मनसे कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला. (Maharashtra Politics)
या घटनेनंतर भाजपकडून मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. आता या वादाचे पडसाद थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणात उमटताना दिसत असून, KDMC मधील महायुतीचे सत्तासमीकरण पुढे कोणते वळण घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)






