Bhaskar Jadhav : फडणवीस यांच्याकडून जरांगेंचा विश्वासघात; भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

Bhaskar Jadhav : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना पुढे करून ते शब्द द्यायला लावतात आणि नंतर तो शब्द पूर्ण करत नाहीत. फडणवीस हे मराठाद्वष्टे आहेत, ते मराठा समाजाला आरक्षण कधीही देणार नाहीत, अशी टीका ठाकरेसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. (Bhaskar Jadhav)
जाधव यांनी टीका केली की, महायुती सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही ही वस्तुस्थिती आहे. सरकारमधील कुठल्याच नेत्यावर आता जरांगे यांचा विश्वास राहिला नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला महायुती सरकारच जबाबदार आहे. मुख्यमंत्री हे मराठा द्वेष्टे आहेत. (Bhaskar Jadhav)
प्रत्येक वेळी नवीन जीआर काढून जरांगे यांचे उपोषण सोडवायचे आणि त्यांचा विश्वासघात करायचा, या सगळ्या गोष्टीमुळे जरांगे आता उद्विग्न झाले आहेत. यावेळी मी जरांगे यांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची सध्या सगळ्या क्षेत्रात दादागिरी सुरु आहे. (Bhaskar Jadhav)
हम करे सो कायदा असा प्रकार त्यांनी राज्यात सुरु केला आहे. अशी टीका जाधव यांनी केली. मराठी सक्तीच्या निर्णयावर जाधव यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Bhaskar Jadhav)
मराठी भाषेचा भाजपला किती तिरस्कार आहे आणि मराठी भाषेच्या विरोधात त्यांची काय भूमिका आहे याचे हे उदाहरण आहे. तसेच, भाजपला आता त्यांचे मित्रपक्ष ओझे वाटू लागले आहे. त्यांना आता मित्र नको आहेत, त्यांना केवळ सत्ता पाहिजे, अशी टीका जाधव यांनी केली. (Bhaskar Jadhav)
मनोज जरांगेंवर काही मंत्री नाराज
मनोज जरांगे हे सरकारच्या भूमिकेवर आणि थेट मंत्र्यांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जरांगे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघात करत आहेत. (Bhaskar Jadhav)
यामुळे समाजासमोर सरकारची प्रतिमा अत्यंत मलिन होत असल्याची भावना अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली. जरांगे यांच्याशी योग्य आणि थेट समन्वय राहावा, यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करावेत, असा सूर काही मंत्र्यांमध्ये उमटत असल्याची माहिती आहे. (Bhaskar Jadhav)
Bhaskar Jadhav : श्रीरामांचा बॅनर, झेंडा, घेऊन गावागावात सभा घेणार; भास्कर जाधव यांची घोषणा
Bhaskar Jadhav : मिसींग लिंकचा मोठेपणा पहिल्याच पावसात मातीमोल – भास्कर जाधव






