Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी राज्यसभेसाठी ‘या’ जेष्ठ नेत्याचं नाव सुचवलं म्हणाले…
Rohit Pawar : या जागेसाठी देखील पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, अनेक नावांची चर्चा आहे. या सगळ्यात अनपेक्षितपणे एक नाव चर्चेत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Rohit Pawar : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसभेच्या 24 जागांसाठी 18 जून या दिवशी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी देखील पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, अनेक नावांची चर्चा आहे. या सगळ्यात अनपेक्षितपणे एक नाव चर्चेत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Rohit Pawar)
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याचे नाव शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुचवलं असून त्यांचा राज्यसभेसाठी विचार केल जावा अशी मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजपच्या आक्रमक महिला नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्यसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी मिळावी, असं म्हटलं आहे. ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार? (Rohit Pawar)
या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे, ती दिली गेली तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणाव लागेल, किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे, असा संदेश जाईल, असं मोठं वक्तव्य देखील रोहित पवारांनी केले आहे.
रोहित पवारांनी केला मोठा दावा (Rohit Pawar)
तसेच त्यांनी छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी दिली तर आम्ही त्याचे स्वागत करु, असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे विधानपरिषदेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या, यावर देखील रोहित पवार यांनी भाष्य केले. आमच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला, हे चूक आहे. पण तो चांगला आणि प्रामाणिक आहे. पैशाचा आकडा जो फुटत आहे, फॉर्म घेण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला 50 – 60 कोटी मोजावे लागत असतील, निवडून येण्यासाठी 50 कोटी तो आकडा बघून महाविकास आघाडीचे उमेदवार कचरले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक ही ठराविक लोकांची निवडणूक झाली आहे, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला.
राष्ट्रवादीमधून ‘या’ नावांची राज्यसभेसाठी चर्चा (Rohit Pawar)
- छगन भुजबळ – सर्वाधिक चर्चेत असलेले नाव. स्वतः भुजबळ यांनीही या जागेवर दावा असल्याचे संकेत दिले आहेत.
- डॉ. प्रमोद हिंदूराव – त्यांनीही या जागेसाठी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे.
- अविनाश आदिक – पक्षाच्या अंतर्गत चर्चेत त्यांचे नाव शॉर्टलिस्टमध्ये असल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा : Neha Kakkar Birthday : समोसे विकणाऱ्या वडिलांची मुलगी ते कोट्यवधींची स्टार; नेहा कक्करची प्रेरणादायी कहाणी





