Mamata Banerjee : मतमोजणीत फेरफार करून भाजपने विजय मिळवला; ममता बॅनर्जी यांचा आरोप
तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बंगालमधील विधानसभेच्या एकूण २९४ पैकी १७७ जागांवरील मतमोजणीत भाजपने फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला.

Mamata Banerjee : तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बंगालमधील विधानसभेच्या एकूण २९४ पैकी १७७ जागांवरील मतमोजणीत भाजपने फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर बंगालमध्ये तृणमूलच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरू झाल्याचा दावा ममतांनी (Mamata Banerjee) केला. त्या कथित हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी त्यांनी कोलकत्यात एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
त्यावेळी बोलताना त्यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत भूमिका मांडली. सध्याच्या कठीण काळात मी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीची बैठक पुढील आठवड्यात दिल्लीत होणार आहे. त्या बैठकीचा संदर्भ देऊन ममतांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले. लवकरच भाजपला राजकीय विरोध असणाऱ्या पक्षांची बैठक होईल.
त्यामध्ये विरोधकांचा देशव्यापी कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे त्यांनी म्हटले. भाजपकडून केले जाणारे सुडाचे राजकारण, नीट परीक्षेचा गोंधळ आदींच्या निषेधासाठीही धरणे धरल्याचे ममतांनी (Mamata Banerjee) नमूद केले. त्यामुळे बंगालची सत्ता गमावल्यानंतर त्या आणखीच आक्रमक बनल्याचे दिसून येत आहे.






