Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विश्वासू महिला नेत्याचा राजीनामा
Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील पक्षांतराचे सत्र आणि राजकीय उलथापालथ सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कल्याणमध्ये मोठा झटका बसला आहे.

Uddhav Thackeray : राज्यातील पक्षांतराच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Uddhav Thackeray)
वैशाली दरेकर-राणे यांनी यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा सामना शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी झाला होता. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण देताना वैशाली दरेकर-राणे यांनी हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे सांगितले. वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विश्वासू महिला नेत्याचा राजीनामा
तसेच, त्यांनी पक्ष सोडलेला नसल्याचेही स्पष्ट करत, “मी केवळ पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची कार्यकर्ती आणि सदस्या म्हणून पुढेही काम करत राहणार आहे,” असे म्हटले. (Uddhav Thackeray)
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. भविष्यात त्या कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Uddhav Thackeray)





