Uddhav Thackeray : “आमच्या घराण्याचा इतिहास किमान शंभर वर्ष ऑन रेकॉर्ड आहे”; घराणेशाहीच्या मुद्यावर टीकाकारांना उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
Uddhav Thackeray : डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला घटना बदलायची आहे, म्हणून पक्ष फोडले जात आहेत, असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray : “ज्या रामाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटताना तुम्हाला लाज नाही वाटत? आम्ही मुद्दे काढले तर म्हणतात बघा यांनी हिंदूत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं?”‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातून बोलताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला घटना बदलायची आहे, म्हणून पक्ष फोडले जात आहेत, असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray)
“हे राजकीय पक्षांना देखील वापरतात, आणि त्यांचं काम झालं की फेकून देतात. तुम्ही रामाला देखील वापरून फेकून दिलं आहे. ज्या रामाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटताना तुम्हाला लाज नाही वाटत? आम्ही मुद्दे काढले तर म्हणतात बघा यांनी हिंदूत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? मुळात प्रश्न आहे तुम्ही आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज, लज्जा आणि शरम सोडली होती, मग आता फरक काय पडतोय? अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकेची तोफ डागली. (Uddhav Thackeray)
घराणेशाहीच्या मुद्यांवरुन टीका करणाऱ्यांना फटकारलं (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरेंवर टीका करताना अनेकांकडून घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जातो. या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जातं. या टीकेलाही उद्धव ठाकरेंनी जशास तसं सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले “ते घराणेशाहीवर बोलतात, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही पण तिची एक परंपरा आहे आणि तिचा मला अभिमान आहे. आमच्या घराण्याचा इतिहास किमान शंभर वर्ष ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? असे संतप्त सवाल करत आम्ही अन्याय आणि ढोंगावर लाथ मारून पुढे जाणारे लोकं आहोत. जे सत्य आहे, त्याच्या खांद्याला खांदा लावून चालणारं आमचं कुटुंब आहे, आणि हीच आमची शिवसेना आहे, अशा शब्दांत घराणेशाहीच्या मुद्यांवरुन टीका करणाऱ्यांना फटकारलं.
युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यात काय फरक (Uddhav Thackeray)
युवकांना ‘झुरळ’ अशी उपमा दिल्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाने ‘पहाडचा चिवा’ म्हटले होते. आज युवकांना झुरळ म्हणणाऱ्यांमध्ये आणि त्यात काय फरक आहे, असा सवाल उपस्थित केला.
Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे उघडून ५,०७९ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडणार





