Uddhav Thackeray: “पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, नाही तर…”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Uddhav Thackeray: 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Uddhav Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचे? या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणातील सुनावणीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यावेळी पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. चिन्ह आपल्याला मिळाले नाही तर ते गोठवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा….
तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. पक्षबांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याच्या सूचना ठाकरेंनी दिल्या. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच एसआयआर प्रक्रियेतून एकाही पात्र व्यक्तीचे नाव वगळले जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोलही सुनावले. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडा, अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा :






