Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेश
Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे.

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या घटनेत करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बदलांबाबत राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे निवडणूक आयोगाने तातडीने खुलासा मागवला आहे. आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत ठराव सादर न केल्याबद्दल आयोगाने पक्षाला नोटीससदृश पत्र पाठवले आहे. (Sunetra Pawar)
माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील कलम 6, 7, 12, 18, 32 आणि 36 मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदलांना मंजुरी देणारे अधिकृत ठराव आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे जमा करण्यात आलेली नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. (Sunetra Pawar)
NCP Sharad Pawar : रोहित पवारांचा संकेत खरा ठरला! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 27 जुलै 2026 रोजी सुनेत्रा पवार यांना अधिकृत पत्र पाठवत या बदलांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. आयोगाच्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावात केवळ कलम 18(1) मधील दुरुस्तीचा उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात पक्षाने इतर अनेक कलमांमध्येही बदल केले असून, त्यासंदर्भातील अधिकृत मंजुरीची कागदपत्रे आयोगाकडे उपलब्ध नाहीत. (Sunetra Pawar)
यामुळे आयोगाने संबंधित सर्व घटनात्मक बदलांना आधार देणारे वैध ठराव आणि आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण आणि कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच या बदलांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. (Sunetra Pawar)






