Entertainment| ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या शोमधील कलाकारांना देखील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शोमधील कलाकारमंडळी अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातच आता अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर बॉलीवूडमध्ये झळकणार आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोपूर्वी तिने अनेक मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आता रसिकाची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली आहे.
‘मुंज्या’ या हॉरर बॉलिवूड सिनेमात मराठमोळी रसिका दिसणार आहे. नुकताच या हॉरर चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रसिकाची झलक पाहायला मिळाली. मात्र या सिनेमात रसिका नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तिच्या बॉलीवूड चित्रपटाबाबत चाहत्यांना देखील उत्सुकता आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकजण रसिकावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. Entertainment|
View this post on Instagram
रसिका वेंगुर्लेकरशिवाय मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर, बालकलाकार खुशी हजारे, शर्वरी वाघ असे बरेच मराठी कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. तर मोना सिंह, अभय वर्मा यात मुख्य भूमिकेत आहेत. Entertainment|
‘मुंज्या’ सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. येत्या ७ जून रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’ चित्रपटाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून ‘मुंज्या’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. याआधी ‘देवयानी’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फ्रेशर्स’ या मालिकांमधील रसिकाच्या भूमिका देखील अप्रतिम ठरल्या होत्या.
हेही वाचा:
“घरात एवढा पैसा झाल्यावर…”; पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावर बच्चू कडू संतापले