Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांत तापमानात मोठा चढ उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीने जोरदार हजेरी लावली आहे. (Maharashtra Weather) त्यामुळे सध्याच्या स्थितीला राज्यावर वातावरणाचे दुहेरी संकट असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक भागात वातावरण वेगळे पाहायला मिळत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. (Maharashtra Weather) राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुपारी 1 ते 4 या वेळेत शुकशुकाट पाहायला मिळतो. जळगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. जळगाव यथे 42.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. (Maharashtra Weather) अकोला आणि मालेगाव येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील काही भाग, आणि कोकणातील मध्यवर्ती भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान असल्याने यामुळे तापमानाचा पाराही वाढत आहे. मुंबई शहरासह नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्मा अधिक तीव्र होत असून, त्यामुळे नागरिकही घराच्या बाहेर पडणे टाळत आहेत. तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather) तर दुसरीकडे कोकणातील रत्नागिरीसह अन्य काही भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळीने धुमाकूळ घातला आहे. यामुळे आंब्यांच्या झाडांसह काजू, नारळाच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस ही स्थिती कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात कायम राहणार असून, काही जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather) बंगालच्या उपसागरासह श्रीलंका आणि आखाती भागांमध्ये तयार झालेल्या चक्राकार वारे आणि त्यामागोमाग सक्रिय होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बहुतांशी पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाल्याचे दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. (Maharashtra Weather)