Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग पुन्हा नंबर एक; ‘या’ विभागाचा निकाल सर्वात कमी
Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे.

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल विभागानुसार असून, आज दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. निकालापूर्वी मंडळाने पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.
मंडळाचे अध्यक्ष त्रिभूवन कुलकर्णी यांन निकालासंदर्भातील तपशील जाहीर करताना सांगितले की, यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी अधिक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
राज्यातील एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेचे निकाल लवकर जाहीर व्हावेत यासाठी दहावीची परीक्षा 10 दिवस लवकर आयोजित केली होती. राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. ९ विभागीय मंडळात हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
निकालाच्या आकडेवारीनुसार, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक लागला आहे.
कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे.
विभागानुसार निकाल (Maharashtra Board 10th Result 2026 Declared)

Maharashtra Board 10th Result 2026 Declared : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग पुन्हा नंबर एक; ‘या’ विभागाचा निकाल सर्वात कमी
कोकण ९७.६२%
कोल्हापूर ९५.४७%
मुंबई ९४.९७%
पुणे ९४.२४%
नाशिक ९०.९३%
अमरावती ९०.५०%
नागपूर ८९.०७%
लातूर ८८.४२%
छत्रपती संभाजीनगर ८८.४१%
राज्याचा एकूण निकाल ९२.०९%





