Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा राज्याला तडाखा; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल
Unseasonal Rain : महाराष्ट्र राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला आहे.

Unseasonal Rain : राज्यभरात काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या खांद्यापर्यंत आलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Unseasonal Rain)
महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Unseasonal Rain)
शेतकऱ्यांनी खूप मेहनतीने, मन लावून, कष्ट करून पिकं वाढवली, पण ऐनवेळी पिकं मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. (Unseasonal Rain)
तसेच कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः धडकी भरवली. शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. (Unseasonal Rain)
विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसामुळे रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. (Unseasonal Rain)
विशेषतः मुंबई गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तळा तालुक्यातील फळशेत गावातील वेदांत साळुंखे (वय १४) याचा वीज पडून मृत्यू झाला. (Unseasonal Rain)
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये घरांचे -अंशतः नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसामुळे रब्बी हंगामातील कापणीला आलेले धान पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर या अस्मानी संकटामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती ओढवली आहे. (Unseasonal Rain)





